Skip to content
2 इतिहास १६:८-१४

2 इतिहास १६:८-१४

कूशी लोक आणि लिबियाचे लोक हे मोठ्या संख्येने रथ आणि घोडेस्वार असलेले बलाढ्य सैन्य नव्हते का? तरीसुद्धा जेव्हा तुम्ही याहवेहवर भरवसा ठेवला, तेव्हा त्यांनी त्यांना तुमच्या हाती दिले.
कारण ज्यांची अंतःकरणे याहवेह यांच्याबरोबर पूर्णपणे वचनबद्ध आहेत, त्यांना बळ देण्यासाठी त्यांची दृष्टी संपूर्ण पृथ्वीवर व्याप्त आहे. तुम्ही मूर्खपणा केला आहे आणि आतापासून तुम्ही युद्धात असाल.”
१०
यामुळे आसा संदेष्ट्यावर रागावला; तो इतका संतापला की त्याने त्याला तुरुंगात टाकले. त्याचवेळेस आसाने काही लोकांवर क्रूरपणे अत्याचार केले.
११
आसाच्या कारकिर्दीच्या घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, यहूदीया आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात नमूद केल्या आहेत.
१२
त्याच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी आसा पायाच्या आजाराने त्रस्त झाला. त्याचा आजार गंभीर स्वरुपाचा होता, तरी त्या आजारपणातही त्याने याहवेहकडून मदत घेतली नाही, परंतु फक्त वैद्यांचीच मदत घेतली.
१३
नंतर आसा त्याच्या कारकिर्दीच्या एकेचाळीसाव्या वर्षी मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला.
१४
त्यांनी त्याला दावीदाच्या नगरात, त्याने स्वतःसाठी तयार केलेल्या कबरेत पुरले. त्यांनी त्याला मसाले आणि विविध मिश्रित अत्तरांनी झाकलेल्या शवपेटीत ठेवले आणि त्याच्या सन्मानार्थ प्रचंड अग्नी पेटविला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options