Skip to content
1 तीमथ्य ५:३-१०

1 तीमथ्य ५:३-१०

ज्या गरजवंत विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर.
परंतु विधवेला मुले अथवा नातवंडे असतील, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबीयांशी सुभक्तीने वागून व आपल्या पितरांचे उपकार फेडण्यास शिकावे, यामुळे परमेश्वराला अतिशय संतोष होतो.
जी वास्तविक विधवा आहे व एकटी पडलेली आहे, तिने परमेश्वरावर आपली आशा ठेवली आहे आणि ती मदतीसाठी रात्रंदिवस विनंत्या व प्रार्थना करीत असते.
परंतु जी विधवा विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे.
त्यांनी निर्दोष असावे म्हणून या गोष्टी निक्षून सांग.
परंतु जर कोणी आपल्या स्वकीयांचे आणि विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे आणि तो अविश्वासणार्‍यापेक्षा वाईट आहे.
जी विधवा साठ वर्षांपेक्षा अधिक आहे, तिच्या पतीबरोबर विश्वासू राहिलेली आहे,
१०
जिच्या चांगल्या कामाबद्दल ती प्रसिद्ध आहे, म्हणजे जिने आपल्या मुलाबाळांचे चांगले संगोपन केले असेल, जिने आतिथी सत्कार केलेला असेल, जिने प्रभूच्या लोकांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांना मदत केली असेल आणि सर्वप्रकारच्या चांगल्या कामासाठी समर्पित केले असेल, तिचे नाव विधवांच्या यादीत लिहावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options