1 तीमथ्य २:८-१५
८
म्हणून सर्वठिकाणी पुरुषांनी राग आणि वादविवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे.
९
स्त्रियांनीही वागणुकीत शांत, समजूतदार, आदरणीय आणि वस्त्रे प्रावरणांत संयमी असावे. वेशभूषा, सोने किंवा मोती किंवा मोलवान पोशाख यामध्ये नव्हे,
१०
तर जे परमेश्वराची भक्ती करणार्यांना शोभेल, अशा आचरणामुळे त्यांच्याकडे लक्ष वेधले जावे.
११
स्त्रियांनी शांतपणे व नम्रतेने शिकावे.
१२
स्त्रियांनी पुरुषांना शिकवावे किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवावा, याला मी परवानगी देत नाही; परंतु त्यांनी शांत राहावे.
१३
कारण आदाम प्रथम घडविला गेला आणि नंतर हव्वा.
१४
आणि सैतानाने आदामाला फसविले नाही; फसविली गेली ती स्त्री आणि ती पापी ठरली.
१५
म्हणून मुलांना जन्म देताना तिचे तारण होईल, ती नेमस्तपणाने विश्वास, प्रीती आणि पवित्रपण यामध्ये राहिल्याने हे होईल.
Settings