Skip to content
1 शमुवेल २६:२१-२५

शौल आपले पाप कबूल करतो

1 शमुवेल २६:२१-२५
२१
तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे. दावीदा, माझ्या पुत्रा, परत ये. कारण आज तू माझ्या जिवास मौल्यवान समजलेस, मी पुन्हा तुला इजा करणार नाही. खरोखरच मी मूर्खासारखा वागलो आणि फार चुकीचे वागलो.”
२२
दावीदाने उत्तर दिले, “हा पाहा, राजाचा भाला, तुमच्या तरुण पुरुषांपैकी एकाने इकडे येऊन तो घेऊन जा.
२३
याहवेह प्रत्येकाला आपआपल्या नीतिमत्तेचे व विश्वासूपणाचे प्रतिफळ देवो. याहवेहने आज तुम्हाला माझ्या हाती दिले होते, परंतु मी याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकणार नाही.
२४
जसा आज तुमचा जीव मला मोलाचा वाटला, तसेच याहवेहला माझाही जीव मोलाचा वाटो आणि ते सर्व संकटांपासून मला वाचवो.”
२५
तेव्हा शौल दावीदास म्हणाला, “दावीदा, माझ्या मुला, तू आशीर्वादित होशील; तू महान गोष्टी करशील आणि खात्रीने विजयी होशील.” तेव्हा दावीद त्याच्या मार्गाने निघून गेला आणि शौल घरी परतला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options