1 शमुवेल २२:३-६
३
तिथून निघून दावीद मोआबातील मिस्पाह येथे गेला आणि मोआबच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर माझ्यासाठी काय करेल, हे मला समजेपर्यंत माझ्या आईवडिलांना तुमच्याजवळ राहू द्याल काय?”
४
तेव्हा त्याने त्यांना मोआबच्या राजाकडे सोडले आणि जोपर्यंत दावीद गडांमध्ये होता तोपर्यंत ते राजाकडे राहिले.
५
परंतु गाद संदेष्टा दावीदाला म्हणाला, “गडांमध्ये राहू नकोस; यहूदीयाच्या प्रदेशामध्ये जा.” तेव्हा दावीद तिथून निघाला आणि हेरेथ नावाच्या जंगलात गेला.
६
आता शौलाने ऐकले की, दावीद आणि त्याच्या माणसांचा शोध लागला आहे. तेव्हा शौल हातात भाला घेऊन, गिबियाह येथील टेकडीवर चिंचेच्या झाडाखाली बसला, त्याचे सर्व अधिकारी त्याच्या सभोवती उभे राहिले.
Settings