मुख्य मजकुरावर जा
1 शमुवेल १५:१०-१६

अवज्ञेमुळे देव शौलाला नाकारतो

1 शमुवेल १५:१०-१६
१०
तेव्हा याहवेहचे वचन शमुवेलकडे आले:
११
“मी शौलास राजा केले याबद्दल मला पश्चाताप होत आहे, कारण तो माझ्यापासून फिरला आहे आणि त्याने माझ्या आज्ञांचे पालन केले नाही.” शमुवेल फार संतापला आणि रात्रभर याहवेहकडे रडला.
१२
सकाळी, अगदी पहाटे उठून शमुवेल शौलाला भेटायला निघाला, पण त्याला कोणी सांगितले, “शौल कर्मेलास गेला आहे. तिथे त्याने आपल्या स्वतःच्या आदरार्थ एक स्तंभ उभारला आहे आणि तिथून पुढे तो खाली गिलगालास गेला आहे.”
१३
जेव्हा शमुवेलने शौलाला गाठले, शौल म्हणाला, “याहवेह तुम्हाला आशीर्वादित करो! मी याहवेहच्या सूचना पार पाडल्या आहेत.”
१४
परंतु शमुवेलने म्हटले, “तर मग मेंढरांचे बेंबावणे व बैलांचे हंबरणे मी ऐकतो ते काय आहे?”
१५
शौलाने उत्तर दिले, “सैन्याच्या लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली आहेत; त्यांनी उत्तम मेंढरे व गुरे याहवेह तुमचा परमेश्वर यांच्या यज्ञासाठी राखून ठेवले आहेत, परंतु बाकीच्या सर्वांचा आम्ही पूर्णपणे नाश केला आहे.”
१६
तेव्हा शमुवेल शौलास म्हणाले, “पुरे! काल रात्री याहवेहने मला काय सांगितले ते मी तुला सांगतो.” “सांगा,” शौल म्हणाला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options