Skip to content
1 शमुवेल १४:१६-२३

1 शमुवेल १४:१६-२३

१६
इकडे बिन्यामीनच्या गिबियाहतील शौलाच्या पहारेकर्‍यांनी पाहिले की सैन्य विखरून सर्व दिशेने धावत जात आहे.
१७
तेव्हा शौलाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांना म्हटले, “आपल्या लोकांची हजेरी घ्या आणि आम्हाला कोण सोडून गेला आहे ते पाहा.” त्यांनी हजेरी घेतली तेव्हा योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तिथे नव्हते.
१८
शौल अहीयाहला म्हणाला, “परमेश्वराचा एफोद इकडे आण,” (कारण त्यावेळी तो इस्राएली लोकांसोबत होता.)
१९
शौल याजकांबरोबर बोलत असताना, पलिष्ट्यांच्या छावणीतील गोंधळ अधिकच वाढत गेला. तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “थांब!”
२०
तेव्हा शौल व त्याचे लोक एकत्र जमा होऊन युद्धास निघाले. त्यांना पलिष्टी लोक मोठ्या गोंधळात, त्यांच्याच तलवारीने एकमेकास मारत असलेले दिसले.
२१
जे इब्री लोक आधी पलिष्ट्यांबरोबर होते व त्यांच्याबरोबर त्यांच्या छावणीत गेले होते, ते आता जे इस्राएली लोक शौल व योनाथान बरोबर होते त्यांच्याकडे गेले.
२२
एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात जे इस्राएली लोक लपून राहिले होते त्यांनी जेव्हा ऐकले की पलिष्ट्यांनी पळ काढला आहे त्यांनीही त्याच ईर्षेने युद्धात भाग घेतला.
२३
अशाप्रकारे त्या दिवशी याहवेहने इस्राएलची सुटका केली आणि युद्ध बेथ-आवेनच्या पलीकडे गेले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options