मुख्य मजकुरावर जा
1 शमुवेल १०:१७-२५

मिस्पा येथे शौलाची सार्वजनिक निवड

1 शमुवेल १०:१७-२५
१७
शमुवेलने इस्राएली लोकांना याहवेहकडे मिस्पाह येथे बोलाविले
१८
आणि त्यांना म्हटले, “याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, असे म्हणतात: ‘मी इस्राएलास इजिप्तमधून बाहेर आणले आणि तुम्हाला इजिप्तच्या सत्तेपासून आणि ज्या सर्व राष्ट्रांनी तुम्हाला अन्यायाने वागवले, त्यांच्यापासून मी तुम्हाला सोडविले.’
१९
परंतु तुम्ही आता तुमच्या परमेश्वराला नाकारले आहे, जे तुम्हाला तुमच्या सर्व अरिष्टांपासून आणि संकटांपासून वाचवितात. आणि तुम्ही म्हणाला, ‘नको, आता आमच्यावर एक राजा नेम.’ तर आता तुमच्या गोत्रानुसार व कुळांनुसार याहवेहसमोर हजर व्हा.”
२०
जेव्हा शमुवेलने सर्व इस्राएलला त्यांच्या गोत्राप्रमाणे पुढे आणले, बिन्यामीन गोत्राची चिठ्ठी निघाली.
२१
नंतर त्याने बिन्यामीन गोत्राला कुळानुसार पुढे आणले आणि मात्रीच्या कुळाची चिठ्ठी निघाली. शेवटी कीशाचा पुत्र शौल याची निवड झाली. परंतु जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला, तेव्हा तो कुठेच सापडला नाही.
२२
तेव्हा त्यांनी याहवेहला विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?” आणि याहवेह म्हणाले, “होय, त्याने स्वतःला सामानामध्ये लपविले आहे.”
२३
तेव्हा त्यांनी पळत जाऊन त्याला बाहेर आणले आणि तो लोकांमध्ये उभा राहिला, तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यापर्यंतच होते.
२४
शमुवेल सर्व लोकांस म्हणाला, “याहवेहने निवडलेल्या या मनुष्याला तुम्ही पाहत आहात काय? सर्व लोकांमध्ये त्याच्यासारखा कोणीही नाही.” तेव्हा लोकांनी मोठ्याने घोषणा दिली, “राजा चिरायू होवो!”
२५
शमुवेलने राजपदाचे हक्क आणि कर्तव्ये लोकांना समजावून सांगितली. त्याने ती एका चर्मपत्राच्या गुंडाळीवर लिहून ठेवली आणि ती याहवेहसमोर ठेवली. नंतर शमुवेलने लोकांना आपआपल्या घरी पाठवून दिले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options