Skip to content
1 राजे ७:४५-५०

1 राजे ७:४५-५०

४५
भांडी, फावडे आणि शिंपडण्याच्या वाट्या. शलोमोन राजासाठी हीरामाने याहवेहच्या मंदिरातील बनविलेल्या या सर्व वस्तू उजळ कास्याच्या होत्या.
४६
राजाने त्या वस्तू सुक्कोथ आणि सारेथान प्रदेशामध्ये यार्देनेच्या पठारावर मातीच्या साच्यात घडवून घेतल्या होत्या.
४७
शलोमोनने या सर्व वस्तूंचे वजन केले नाही, कारण ते पुष्कळ होते; कास्याचे वजन करणे शक्य नव्हते.
४८
याहवेहच्या मंदिरामध्ये असलेली उपकरणेसुद्धा शलोमोनाने तयार करून घेतली होती: सोन्याची वेदी; मेजावर समक्षतेची भाकर ठेवली होती;
४९
शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ (आतील पवित्रस्थानासमोर पाच उजवीकडे व पाच डावीकडे); सोन्याच्या फुलांची सजावट, दिवे आणि चिमटे;
५०
शुद्ध सोन्याची गंगाळे, वाती कापण्याची कात्री, शिंपडण्याचे कटोरे, पात्रे व धूपदाण्या; आतील खोलीच्या, म्हणजेच परमपवित्रस्थानाच्या आणि मंदिराच्या मुख्य खोलीच्या दरवाजासाठी सोन्याच्या कड्या.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options