1 राजे २०:२-६
२
त्याने इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे शहरात असे सांगत दूत पाठवले,
३
“बेन-हदाद असे म्हणतो: ‘तुझे चांदी व सोने माझे आहेत, तुझ्या उत्तम स्त्रिया आणि लेकरे ही सुद्धा माझी आहेत.’ ”
४
इस्राएलच्या राजाने उत्तर दिले, “माझ्या स्वामी, आपल्या म्हणण्याप्रमाणे मी व माझे जे काही आहे ते सर्व आपलेच आहे.”
५
दूत पुन्हा येऊन म्हणाले, “बेन-हदाद असे म्हणतो: ‘तुझी चांदी व सोने, तुझ्या स्त्रिया व लेकरे यांना माझ्या स्वाधीन करावे म्हणून सांगितले होते.
६
परंतु उद्या याच वेळी तुझ्या राजवाड्यात व तुझ्या अधिकार्यांच्या घरात शोध करावा म्हणून मी माझे अधिकारी पाठवेन. तुझे जे काही मौल्यवान आहे ते सर्व ते घेऊन जातील.’ ”
Settings