Skip to content
1 राजे १६:२४-३३

1 राजे १६:२४-३३

२४
त्याने शेमेर नावाच्या व्यक्तीकडून शोमरोन डोंगर चांदीचे दोन तालांत देऊन विकत घेतले आणि त्या डोंगरावर नगर बांधले व त्या डोंगराचा आधीचा मालक शेमेर याच्या नावानुसार शोमरोन असे नाव दिले.
२५
पण ओमरीने सुद्धा याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले आणि त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्यांपेक्षा अधिक पाप केले.
२६
त्याने पूर्णपणे नेबाटाचा पुत्र यरोबोअमचे अनुसरण केले होते, यरोबोअमने इस्राएली लोकांना जी पापे करावयाला भाग पाडले, ती त्याने केली आणि त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला.
२७
ओमरीच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेल्या गोष्टी व त्याची यशप्राप्ती इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही?
२८
ओमरी आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला शोमरोनात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र अहाब त्याचा वारस म्हणून राजा झाला.
२९
यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या अडतिसाव्या वर्षी ओमरीचा पुत्र अहाब इस्राएलवर राज्य करू लागला. त्याने शोमरोन येथे इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले.
३०
ओमरीचा पुत्र अहाबाने त्याच्या आधी होऊन गेलेल्यांपेक्षा याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
३१
नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या पापांना क्षुल्लक समजून त्याचे अनुसरण केले; इतकेच नाही, तर त्याने सीदोनी राजा एथबालची कन्या ईजबेल हिच्याशी विवाह केला आणि बआलची सेवा व उपासना करू लागला.
३२
शोमरोनात त्याने बआलासाठी जे मंदिर बांधले होते त्यात बआलासाठी एक वेदी उभारली.
३३
अहाबाने अशेरा देवीचे स्तंभही उभारले आणि असे करून त्याच्या आधी होऊन गेलेल्या राजांपेक्षा याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या क्रोधाला अधिक भडकाविले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options