1 करिंथकरांस ७:३२-४०
३२
तुम्ही चिंता विरहित असावे, अशी माझी इच्छा आहे. एखादा अविवाहित पुरुष प्रभूचे कार्य—प्रभूला कसे संतोषविता येईल, यासंबंधी काळजी करतो.
३३
तरी विवाहित पुरुष जगातील गोष्टींचा आणि आपल्या पत्नीला आनंदी कसे ठेवता येईल, याचा विचार करतो.
३४
त्याच्या आवडीनिवडी विभागल्या जातात. अविवाहित स्त्री वा कुमारिकेचे प्रभूला शरीराने व आत्म्याने संतुष्ट करण्याचे ध्येय असते, परंतु विवाहित स्त्री जगाच्या गोष्टींविषयी व आपल्या पतीला कसे संतोषवावे याकडे लक्ष देते.
३५
हे मी तुमच्या भल्यासाठी सांगत आहे, तुम्हावर निर्बंध घालण्यासाठी नव्हे, यासाठी की तुम्ही योग्यप्रकारे जीवन जगावे आणि तुमचे मन विचलित न होता प्रभूला पूर्णपणे समर्पित व्हावे.
३६
जर मागणी झालेल्या कुमारिकेशी एखादा मनुष्य आदरपूर्वक वागत नाही असे त्याला वाटले, आणि त्याच्या भावना अतितीव्र आहेत तर त्याने जे योग्य आहे ते करावे. त्यांनी लग्न करावे, केल्यास तो पाप करत नाही.
३७
परंतु एखाद्या माणसाचे मन स्थिर आहे व जो दडपणाखाली नाही व ज्याचा आपल्या शरीरावर ताबा आहे, त्याने कुमारिकेशी विवाह न करण्याचे ठरविले असेल, तर तो मनुष्य योग्य करतो.
३८
म्हणून मग जो पुरुष कुमारिकेशी विवाह करतो, तो चांगले करतो. परंतु जो विवाह करीत नाही तो अधिक चांगले करतो.
३९
पती जिवंत असेल तोपर्यंत पत्नी आपल्या पतीला बांधलेली आहे. पती मरण पावला, तर ती पाहिजे त्याच्याशी लग्न करण्यास मोकळी आहे, पण तो प्रभूमध्ये विश्वासू असावा.
४०
पण माझ्या मते ती जशी आहे तशी राहिली तर ती अधिक सुखी होईल—आणि मला असे वाटते की माझ्यातही परमेश्वराचा आत्मा वास करतो.
Settings