1 करिंथकरांस १:१८-३१
१८
क्रूसाचा संदेश नाश पावत असलेल्यांना मूर्खपणाचा वाटतो, तरी तारणाची प्राप्ती होत आहे अशा आपल्यासाठी तो परमेश्वराचे सामर्थ्य असा आहे.
१९
कारण असे लिहिले आहे: “ज्ञानी लोकांचे ज्ञान मी नष्ट करेन. बुद्धिमानाची बुद्धी मी निष्फळ करेन.”
२०
मग ज्ञानी लोक कुठे आहेत? नियमशास्त्र शिक्षक कुठे आहेत? या युगाचे तत्वज्ञानी कुठे आहेत? जे मूर्ख आहेत त्यांना परमेश्वराने जगाचे ज्ञान असे केले नाही का?
२१
कारण परमेश्वराच्या ज्ञानामध्ये असतानाही जगाला त्याच्या ज्ञानाद्वारे परमेश्वराला ओळखता आले नाही, जो प्रचार मुर्खपणाद्वारे केला होता त्यावर विश्वास ठेवणार्या सर्वांचे परमेश्वराने आनंदाने तारण केले.
२२
यहूदी लोक चिन्हाची मागणी करतात; आणि ग्रीक लोक ज्ञान शोधतात.
२३
पण आम्ही क्रूसावर खिळलेल्या ख्रिस्ताला गाजवितो: जो यहूदीयांना अडखळण आणि गैरयहूदीयांना मूर्खपणा असा आहे,
२४
परंतु परमेश्वराने ज्यांना बोलाविले आहे, त्या यहूदी आणि ग्रीक, या दोघांनाही ख्रिस्त हे परमेश्वराचे सामर्थ्य आणि ज्ञान आहे.
२५
परमेश्वराची मूर्खता मानवी शहाणपणापेक्षा अधिक सुज्ञपणाची आहे, आणि परमेश्वराचा अशक्तपणा मनुष्याच्या सामर्थ्यापेक्षा बलवान आहे.
२६
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ज्यावेळी तुम्हाला पाचारण करण्यात आले त्यावेळी तुम्ही कोण होता याचा विचार करा. तुम्ही अनेकजण तर मनुष्यांच्या दृष्टीने शहाणे; किंवा प्रभावी किंवा कुलीन कुळात जन्मलेले नव्हता.
२७
तरी जगाच्या दृष्टीने जे सुज्ञ आहेत अशांना लाजविण्याकरिता परमेश्वराने मूर्खपणाच्या गोष्टी निवडल्या; आणि सशक्तांना लाजविण्याकरिता त्यांनी जगातील दुर्बल गोष्टी निवडल्या.
२८
परमेश्वराने जगातील धिक्कारलेले, अकुलीन यांना निवडले, जेणे करून त्यांना शून्यवत करावे.
२९
आणि म्हणूनच परमेश्वरासमोर कोणत्याही मनुष्याने बढाई मारू नये.
३०
कारण त्यामुळेच तुम्ही ख्रिस्त येशूंमध्ये आहात, ते परमेश्वरापासून आपले ज्ञान व नीतिमत्व, पवित्रता आणि खंडणी असे झाले आहेत.
३१
यास्तव शास्त्रलेखात लिहिले आहे: “जो प्रौढी मिरवतो त्याने प्रभूमध्ये प्रौढी मिरवावी.”
Settings