Skip to content
1 इतिहास २६:१३-३२

1 इतिहास २६:१३-३२

१३
प्रत्येक द्वारांसाठी, लहान थोर सारखेच समजून त्यांच्या कुटुंबानुसार चिठ्ठ्या टाकण्यात आल्या.
१४
पूर्वेकडील द्वारासाठी शेलेम्याहच्या नावाची चिठ्ठी निघाली. उत्तरेकडील द्वाराची त्याचा पुत्र जखर्‍याहकडे गेली, जो एक बुद्धिमान सल्लागार होता.
१५
दक्षिणेकडील द्वार ओबेद-एदोम आणि त्याच्या पुत्रांच्या ताब्यात कोठारे दिली गेली.
१६
पश्चिमेकडील द्वाराची व शल्लेकेथ द्वाराशी चढून जाण्याच्या मार्गावर पहारा देण्याची जबाबदारी शुप्पीम व होसाह यांच्याकडे आली.
१७
पूर्वेच्या द्वारासाठी रोज सहा लेवी, उत्तरेच्या द्वारासाठी चार रक्षक, दक्षिणेच्या द्वारासाठी चार रक्षक आणि भांडारावर एकाच वेळी प्रत्येकी दोन.
१८
न्यायालयाच्या पश्चिमेकडील द्वारांसाठी मार्गावर चार व न्यायालयात दोन रक्षक.
१९
हे द्वारपालांचे विभाजित वर्ग कोरही आणि मरारी वंशातील होते.
२०
अहीयाह लेवीस परमेश्वरासाठी मंदिराचे खजिनदार आणि वाहिलेल्या अर्पणांची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले.
२१
लादानाचे वंशज, जे लादान गेर्षोनी होते व जे गेर्षोनी लादानाचे यहीएली कुटुंबप्रमुखांचा समावेश होता.
२२
यहीएलीचे पुत्र जेथाम आणि त्याचा भाऊ योएलना याहवेहच्या मंदिराच्या खजिन्यावर अधिकारी नेमले होते.
२३
अम्रामी पासून इसहारी हेब्रोनी व उज्जीएली:
२४
मोशेचा पुत्र गेर्षोमच्या वंशातील शबुएल खजिन्यावर प्रमुख अधिकारी होता.
२५
एलिएजरपासून त्याचे नातेवाईक: त्याचा पुत्र रहब्याह, त्याचा पुत्र यशायाह, त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र जिक्री, व त्याचा पुत्र शेलोमीथ.
२६
(हा शेलोमीथ आणि त्याचे नातेवाईक दावीद राजाने, हजार सैनिकांचे, शताधिपतींच्या आणि इतर सैनिकांच्या सेनाधिकारींचे कुटुंबप्रमुख, या सर्वांनी अर्पण केलेल्या भांडार वस्तूंची काळजी घेत.
२७
लढाईतील काही लूट याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीच्या खर्चासाठी अर्पण करीत.
२८
शमुवेल संदेष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर आणि जेरुइयाहचा पुत्र योआब यांनी अर्पण केलेले सर्वकाही आणि इतर अर्पणे सांभाळण्याची जबाबदारी शेलोमीथ आणि त्याच्या नातेवाईकांवर टाकण्यात आली.)
२९
इसहार्‍यांपैकी: कनन्याह आणि त्याचे पुत्र यांची नेमणूक मंदिरापासून दूर इस्राएली लोकांवर अधिकारी आणि न्यायाधीश म्हणून करण्यात आली.
३०
हेब्रोन्यांपैकी: हशब्याह आणि त्याचे नातेवाईक 1,700 सक्षम पुरुष यार्देन नदीच्या पश्चिमेकडील इस्राएलाच्या प्रदेशाचे प्रमुख होते. याहवेहची आणि राजाची सेवा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
३१
हेब्रोन्यातील यरीयाह हा त्यांच्या वंशावळीच्या नोंदीनुसार त्यांचा कुटुंबप्रमुख होता. (दावीद राजाच्या शासनकाळात चाळिसाव्या वर्षी शिरगणतीत शोध घेण्यात आला. गिलआदामधील हिब्रोनी याजेरमध्ये सक्षम पुरुष आढळून आले.
३२
येरीह कडे 2,700 कुटुंब होते, जे सक्षम असून कुटुंबप्रमुख होते. दावीद राजाने त्यांना रऊबेन, गाद आणि मनश्शेहचे अर्धे गोत्र यांच्या परमेश्वरा संबंधित धार्मिक व सामाजिक बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमले.)

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options