Skip to content
1 इतिहास २:१८-२४

हेस्रोनाचा पुत्र कालेब याचे वंशज

1 इतिहास २:१८-२४
१८
हेस्रोनचा पुत्र कालेबास त्याच्या पत्नी अजूबा (व यरियोथ) यांच्यापासून संतती झाली. अजुबाहचे पुत्र: येशेर, शोबाब व अर्दोन.
१९
अजुबाहच्या मृत्यूनंतर कालेबाने एफ्राथेशी विवाह केला. तिच्या पोटी त्यास हूर झाला.
२०
हूरास उरी झाला व उरीस बसालेल झाला.
२१
नंतर हेस्रोन साठ वर्षांचा असता त्याने गिलआदाचा पिता माखीरच्या कन्येशी विवाह केला व तिच्याशी केलेल्या प्रीतीसंबंधाने त्यास सगूब हा झाला.
२२
सगूबास याईर झाला, याईराने गिलआद प्रांतात तेवीस शहरांचे नियंत्रण केले.
२३
(पण गशूर व अराम यांनी हव्योथ याईर व केनाथ आणि त्यांच्या आसपासची गावे अशी एकंदर साठ नगरे हस्तगत केली.)
२४
हेस्रोन कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यावर त्याची पत्नी अबीयाहच्या पोटी त्याला तकोवाचा पिता अश्हूर हा झाला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options