- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
दावीदाची उपकारस्मरणाची प्रार्थना
1 इतिहास १७:१६-२७
१६
तेव्हा दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाला: “हे याहवेह परमेश्वरा, मी कोण आहे आणि माझे कुटुंब काय आहे की, तुम्ही मला येथवर आणावे?
१७
माझ्या परमेश्वरा, तुमच्या दृष्टीने हे जणू पुरेसे नव्हते, तर तुम्ही माझ्या कुटुंबाच्या भविष्याबद्दलही अभिवचन दिले आहे. याहवेह परमेश्वरा, मी जणूकाही कोणीतरी फार श्रेष्ठ दर्जाचा आहे, अशा नजरेने तुम्ही माझ्याकडे बघितले आहे.
१८
“तुम्ही दावीद या आपल्या सेवकाला मोठा सन्मान दिला आहे, तर मी पुढे काय बोलू? आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता.
१९
हे याहवेह, तुम्ही आपल्या सेवकासाठी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे हे सर्व महान कार्य केले आहे आणि थोर अभिवचन दिले आहे.
२०
“हे याहवेह, तुमच्यासारखे कोणी परमेश्वर नाही. जे आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे त्यानुसार तुमच्याशिवाय कोणीही परमेश्वर नाही.
२१
आपल्या इस्राएली लोकांसारखे कोण आहे; पृथ्वीवरील असे एक राष्ट्र, ज्यांच्या परमेश्वरांनी बाहेर जाऊन स्वतःसाठी व तुमच्या नावासाठी इजिप्तमधून त्यांना खंडून घेतले, म्हणजे राष्ट्रे व त्यांची दैवते यांच्यामधून सोडविले व त्यांच्यादेखत आपल्या लोकांसाठी महान व अद्भुत कार्य केले?
२२
तुम्ही आपल्या इस्राएली लोकांना सर्वकाळासाठी तुमचे स्वतःचे खास लोक बनविले आहे आणि हे याहवेह तुम्ही त्यांचे परमेश्वर झाला आहात.
२३
“तर आता, हे याहवेह, आपला सेवक व त्याच्या घराण्याविषयी जे अभिवचन तुम्ही दिले आहे, ते आपण सर्वकाळासाठी स्थापित करावे. आपण म्हटल्याप्रमाणे ते आपण करावे.
२४
यासाठी की ते स्थापित व्हावे आणि तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलवर राज्य करणारे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीदाचे घराणे तुमच्यासमोर स्थापित व्हावे.
२५
“हे माझ्या परमेश्वरा, तुम्ही तुमच्या सेवकास प्रकट केले आहे, की तुम्ही त्याच्यासाठी एक घर बांधाल. त्यामुळे आपल्या सेवकाला तुमच्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य आले आहे.
२६
याहवेह, परमेश्वर तुम्हीच आहात! तुम्ही आपल्या सेवकासाठी उत्तम गोष्टींचे अभिवचन दिले आहे.
२७
आता आपल्या सेवकाच्या घराण्याला आशीर्वाद देण्यास तुम्ही प्रसन्न आहात, म्हणजे ते तुमच्या दृष्टीत सदैव राहावे; कारण हे याहवेह, तुम्ही ते आशीर्वादित केले आहे, आणि ते सदैव आशीर्वादित व्हावे.”
Settings