मुख्य मजकुरावर जा
1 इतिहास १६:३७-४३

अखंड उपासनेची व्यवस्था

1 इतिहास १६:३७-४३
३७
दररोज गरजेप्रमाणे आसाफ आणि त्याचे भाऊबंद यांची याहवेहच्या कोशाची नियमितपणे करारबद्ध सेवा करण्यासाठी दावीदाने नेमणूक केली.
३८
तसेच ओबेद-एदोम आणि त्याचे अडुसष्ट नातलग आणि यदूथूनाचा पुत्र ओबेद-एदोम आणि होसाह यांचा द्वारपाल म्हणून समावेश केला.
३९
दावीदाने गिबोन टेकडीवरील याहवेहच्या सभामंडपात सादोक याजक आणि त्याचे याजक भाऊबंद सेवा करण्यासाठी ठेवले.
४०
ते दररोज, सकाळ व संध्याकाळ, याहवेहने इस्राएली लोकांना दिलेल्या आज्ञेनुसार होमवेदीवर नियमितपणे होमार्पणे करीत होते.
४१
त्यांच्यासोबत हेमान, यदूथून आणि नावे घेऊन निवडलेल्या इतर अनेकांची नेमणूक केली. या सर्वांना “याहवेहची प्रीती सनातन आहे” अशी त्यांची उपकारस्तुती करण्यासाठी नेमण्यात आले होते.
४२
त्यांच्याबरोबर हेमान आणि यदूथून यांना कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती करण्याची जबाबदारी दिली. यदूथूनच्या पुत्रांची द्वारपाल म्हणून नेमणूक करण्यात आली.
४३
नंतर सर्व लोक आपापल्या नगरास परत गेले आणि दावीदही आपल्या कुटुंबीयांना आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options