Zachariah बद्दल बायबलमधील वचने: 1. Son of Jeroboam, and last of the house of Jehu
1. Son of Jeroboam, and last of the house of Jehu बद्दल वचने
याहवेह येहूला म्हणाले, “माझ्या दृष्टीने तू जे योग्य ते केले आहे आणि जे माझ्या मनात अहाबाचा घराण्याविषयी होते ते तू सर्व केले, म्हणून चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलच्या राजासनावर बसतील.”
यरोबोअम त्याचे पूर्वज इस्राएली राजांना मिळाला. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र जखर्याह त्याच्या जागी इस्राएलावर राज्य करू लागला.
यहूदीयाचा राजा अजर्याहच्या अडतिसाव्या वर्षी यरोबोअमाचा पुत्र जखर्याह शोमरोनात इस्राएलावर राजा झाला आणि त्याने सहा महिने राज्य केले.
आपल्या पूर्वजांप्रमाणेच याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.
याबेशाचा पुत्र शल्लूमाने जखर्याहविरुद्ध कट रचला. त्याने लोकांसमोर त्याच्यावर हल्ला करून ठार त्याला केले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.
जखर्याहच्या कारकिर्दीतील इतर घटना इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेल्या नाहीत काय?
याहवेहने येहूला दिलेले वचन पूर्ण झाले: “चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलच्या राजासनावर बसतील.”