मुख्य मजकुरावर जा

Zabdi बद्दल बायबलमधील वचने

6 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. परंतु इस्राएली लोक समर्पित केलेल्या वस्तूंबाबतीत अविश्वासू होते; यहूदाह गोत्रातील जेरहाचा पुत्र जब्दी याचा पुत्र कर्मी, याचा पुत्र आखानाने त्यातील काही वस्तू घेतल्यामुळे याहवेहचा क्रोध इस्राएल राष्ट्राविरुद्ध भडकला.

  2. यहूदाहचे गोत्र पुढे आले आणि जेरहाचे कूळ निवडण्यात आले. त्याच्या कुळातील प्रत्येक कुटुंब पुढे आले आणि जब्दीचे घराणे निवडले गेले.

  3. मग जब्दीच्या घराण्यातील एकाएका पुरुषाला समोर आणण्यात आले आणि यहूदाहच्या वंशातील जेरहाचा पुत्र जब्दीचा पुत्र कर्मीचा पुत्र आखान निवडला गेला.

  4. याकीम, जिक्री, जब्दी,

  5. रामाही शिमी राजाच्या द्राक्षमळ्यांवर देखरेख करणारा होता. जब्दी शिफमी द्राक्षारस बनविणे व त्याचा साठा करणे यास जबाबदार होता.

  6. मत्तन्याह, हा मीखाहचा पुत्र, तो जब्दीचा पुत्र, जो आसाफाचा पुत्र, तो उपकारस्तुतीत व प्रार्थनेत नेतृत्व करणारा प्रमुख होता; बकबुकियाह, त्याच्या सहकाऱ्यातील दुसरा; आणि अब्दा, हा शम्मुवाचा पुत्र, तो गालालचा पुत्र, जो यदूथूनाचा पुत्र होता.