Witchcraft बद्दल बायबलमधील वचने: Witches destroyed
Witches destroyed बद्दल वचने
शमुवेल तर मरण पावला होता आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्यासाठी शोक केला होता आणि त्याला त्याच्याच रामाह नगरात पुरले होते. शौलाने मृतात्म्यांशी संपर्क साधणारे आणि तंत्रमंत्र करणारे यांना देशातून घालवून दिले होते.
परंतु ती स्त्री त्याला म्हणाली, “तुला नक्कीच माहीत आहे की, शौलाने काय केले आहे. चेटकीण आणि तंत्रमंत्र करणाऱ्यांना त्याने या देशातून घालवून टाकले आहे. मी मरावे म्हणून माझ्या जिवासाठी तू सापळा का टाकतोस?”