Skip to content

Wine Press बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तुमचे अर्पण खळ्यातील धान्य किंवा द्राक्षकुंडातील रसाप्रमाणे तुमच्यासाठी गणले जाईल.

  2. “लेव्यांना सांग: ‘जेव्हा तुम्ही सर्वोत्तम भाग सादर करतात, ते तुमच्यासाठी खळ्यातील किंवा द्राक्षकुंडातील उत्पन्न गणले जाईल.

  3. तर तुम्ही तुमच्या गुरांच्या कळपातून, तुमच्या खळ्यातून, तुमच्या द्राक्षारसाच्या कुंडातून उदारहस्ते द्यावे. ज्याप्रकारे याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे त्याप्रकारे त्यांना द्या.

  4. याहवेहचा दूत आला आणि ओफराह येथील एला वृक्षाखाली बसला. तो वृक्ष अबियेजरी योआशच्या मालकीचा होता, जिथे त्याचा पुत्र गिदोन मिद्यानी लोकांपासून वाचविण्यासाठी द्राक्षकुंडात गहू मळत होता.

  5. त्याने ते खोदले आणि त्यातील दगड काढून ते स्वच्छ केले आणि मनपसंद द्राक्षवेलींचे तिथे रोपण केले. त्याने त्यामध्ये एक टेहळणी बुरूज बांधला आणि त्याचबरोबर द्राक्षकुंडही तयार केला. नंतर त्याने उत्तम द्राक्षांच्या पिकांची वाट पाहिली, परंतु तिथे फक्त वाईट फळे उपजली.

  6. मोआबभूमीच्या मळ्यामधून व शेतातून आनंद व हर्ष लयास गेले आहेत. द्राक्षकुंडातून द्राक्षारसाचा प्रवाह मी बंद केला आहे; हर्षनाद करून द्राक्षे तुडविणारा कोणी नाही. ओरडणे आहे, होय पण ते आनंदाचे नाही.

  7. “दुसरा एक दाखला ऐका: एका जमीनदाराने एक द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली व त्यात द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन दुसर्‍या ठिकाणी राहवयास गेला.

  8. मग येशू त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागले: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली, द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन तो दुसर्‍या ठिकाणी राहवयास गेला.