Skip to content

Vinegar बद्दल बायबलमधील वचने

9 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तर त्या नाजीरांनी द्राक्षारस व इतर आंबलेले पेय वर्ज्य करावे आणि त्यांनी द्राक्षारसाचा शिरका किंवा इतर आंबलेले पेय पिऊ नये. त्यांनी द्राक्षाचा रस पिऊ नये किंवा द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत.

  2. भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये. थोडी भाकरी घे आणि द्राक्षाच्या सिरक्यामध्ये बुडवून खा.” जेव्हा ती कापणी करणाऱ्याबरोबर खाली बसली, तेव्हा त्याने तिला थोडे भाजलेले धान्य दिले. तिने तिला हवे तेवढे खाल्ले आणि थोडेसे राहिले होते.

  3. अन्न म्हणून त्यांनी मला विष दिले, तहान भागविण्यासाठी त्यांनी मला आंब दिला.

  4. जशी आंब दातांस आणि धूर डोळ्यास, तसा आळशी मनुष्य त्याला पाठविणाऱ्यास आहे.

  5. ज्याचे अंतःकरण दुःखाने भरले आहे, त्याच्यासाठी हर्षगीत गाणे, एखाद्याचे पांघरूण थंडीच्या दिवसात काढून घेणे, किंवा जखमेवर शिरका ओतणार्‍यासारखे आहे.

  6. त्या ठिकाणी त्यांना पित्त मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला. परंतु त्यांनी तो चाखून पाहिल्यावर घेतला नाही.

  7. लागलीच त्यांच्यापैकी एकाने धावत जाऊन शिरक्यात भिजविलेला एक स्पंज काठीवर ठेवून येशूंना प्यावयास दिला,

  8. त्यांनी येशूंना गंधरस मिसळलेला द्राक्षारस दिला, परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही.

  9. तिथे शिरक्यात भिजविलेला एक स्पंज एजोबाच्या काठीवर ठेवून व काठी उंच करून त्यांनी येशूंच्या ओठांना लावला.