Victories बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
दावीदाने पलिष्टी गल्याथाला ठार मारल्यानंतर ज्यावेळी लोक परत घरी येत होते, त्यावेळी इस्राएलच्या सर्व नगरांतून प्रत्येक गावातून स्त्रिया गात व नाचत आणि हर्षाने डफ व झांजा वाजवित शौल राजाला भेटायला आल्या.
नाचत असताना त्यांनी गीत गाईले: “शौलाने त्याच्या हजारास वधले, दावीदाने त्याचे दहा हजार वधले.”
“गथमध्ये हे सांगू नका, अष्कलोनच्या रस्त्यांवर याची घोषणा करू नका, नाहीतर पलिष्ट्यांच्या कन्या हर्ष पावतील, बेसुंत्यांच्या कन्या आनंद करतील.
जरी माझे बरेच विरोधक तिथे होते, जे युद्ध माझ्याविरुद्ध सुरू होते, तरी ते मला कोणतीही इजा होऊ न देता सोडवितात.
प्रबळांची लूटमार झाली आहे, ते मृत्यूची निद्रा घेत आहेत; त्यांच्यातील एकाही योद्ध्याला हात उचलता येत नाही.
हे याकोबाच्या परमेश्वरा, तुम्ही फटकारल्यावर घोडे आणि स्वार गाढ झोपेत गेले आहेत.
जरी हे सर्व तुम्हाला आधी माहीत आहे, तरी तुम्हाला आठवण करून देतो की प्रभूने त्यांच्या लोकांना इजिप्तमधून सोडविले, परंतु नंतर त्यांच्यावर विश्वास न ठेवणार्यांचा त्यांनी नाश केला.