मुख्य मजकुरावर जा

Union With Christ बद्दल बायबलमधील वचने: Foundation and building

7 वचने · 41 पैलू

"Union With Christ" साठी शोधा

Foundation and building बद्दल वचने

  1. परमेश्वराने जी कृपा मला दिली आहे, त्यानुसार मी कुशल बांधकाम करणार्‍यासारखा पाया घातला आणि आणखी कोणी त्यावर बांधकाम करीत आहे. परंतु प्रत्येकाने बांधकाम काळजीपूर्वक केले पाहिजे.

  2. जो पाया आधी घातलेला आहे, जे स्वतः येशू ख्रिस्त आहे, त्या व्यतिरिक्त दुसरा पाया कोणालाही घालता येणार नाही.

  3. तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या भक्कम पायावर बांधलेले आहात, ज्याची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहेत.

  4. त्यांच्यामध्ये पूर्ण इमारत एकत्र जोडली जात असताना वाढत जाऊन प्रभूचे पवित्र मंदिर होत आहे.

  5. जो जिवंत दगड बांधणार्‍यांनी नाकारला, परंतु परमेश्वराने निवडलेला आणि त्यांना मोलवान असलेल्या ख्रिस्ताकडे तुम्ही आला आहात.

  6. तुम्ही सुद्धा, जिवंत दगडांसारखे आत्मिक मंदिर म्हणून बांधले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने स्वीकारण्यास योग्य असे आत्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.

  7. कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी एक दगड ठेवितो निवडलेला आणि मौल्यवान कोनशिला, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”