Skip to content

Tychicus बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्याच्याबरोबर बिरुया मध्ये राहणारा पुर्राचा पुत्र सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकूंद, दर्बे येथील गायस व तीमथ्य देखील, तसेच आशिया प्रांतातील तुखिक व त्रोफिम होते.

  2. येथे मी कसा आहे व काय करीत आहे, यासंबंधीची सर्व हकिकत माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी तुखिक तुम्हाला सांगेल.

  3. आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुम्हाला प्रोत्साहित करावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवित आहे.

  4. तुखिक माझे सर्व वर्तमान तुम्हाला सांगेल. तो माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी आहे.

  5. मी त्याला याच हेतूने पाठवित आहे की त्याद्वारे तुम्हाला आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुमच्या हृदयास प्रोत्साहित करावे.

  6. मीच तुखिकास इफिसास पाठविले

  7. अर्तमाला किंवा तुखिकाला मी तुझ्याकडे पाठविल्यानंतर शक्य तितक्या लवकर तू मला निकोपोलीस येथे येऊन भेट, कारण मी हिवाळ्यात तिथेच राहण्याचा निश्चय केला आहे.