Toe बद्दल बायबलमधील वचने: Anointed in purification
Anointed in purification बद्दल वचने
मग याजकाने या दोषबलीचे काही रक्त घ्यावे आणि शुद्ध होणार्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे.
यानंतर तळहातावर शिल्लक राहिलेले तेल याजकाने शुद्ध होणार्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या पायाच्या व उजव्या हाताच्या अंगठ्यावरील दोषबलीच्या रक्तावर लावावे.
त्यानंतर दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि याजकाने त्याचे काही रक्त घेऊन शुद्ध होणार्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला आणि उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे.
मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन ते शुद्ध होणार्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला आणि उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला दोषबलीचे रक्त लावले त्या जागी लावावे.