Timbrel बद्दल बायबलमधील वचने: Used in religious service
Used in religious service बद्दल वचने
दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर चिपळ्या, सनोवर लाकडापासून बनविलेले वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा वाजवित आनंद करीत होते.
दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने परमेश्वरासमोर वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा व कर्णे वाजवित आनंद करीत होते.
गाणारे पुढे, वाद्ये वाजविणारे मागे आणि त्या दोहोंच्यामध्ये कुमारिका खंजिर्या वाजवित चालल्या आहेत.
खंजिरीच्या तालावर संगीताचा प्रारंभ करा, वीणा व सतारीवर मधुर स्वर वाजवा.
त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत, डफ आणि वीणा यांच्या संगीताच्या साथीवर स्तुती गा.
डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा; तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा.