मुख्य मजकुरावर जा

The Diet of the Jews बद्दल बायबलमधील वचने

12 वचने · 33 पैलू

"The Diet of the Jews" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. मग याहवेहने मोशेला म्हटले, “मी तुमच्यासाठी स्वर्गातून भाकरीची वृष्टी करेन. लोकांनी दररोज बाहेर जाऊन त्या दिवसासाठी पुरेलसे गोळा करावे. म्हणजे ते माझ्या सूचनेप्रमाणे वागतात की नाहीत याची मला परीक्षा करता येईल.

  2. सहाव्या दिवशी ते जे काही आत आणतील ते त्यांनी तयार करावे आणि दररोज ते जेवढे गोळा करतात त्यापेक्षा दुप्पट असावे.”

  3. मग मोशे व अहरोन यांनी सर्व इस्राएली लोकांना सांगितले, “संध्याकाळच्या वेळी तुम्हाला समजेल की याहवेहनेच तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.

  4. आणि सकाळी तुम्ही याहवेहचे गौरव बघाल, कारण तुम्ही याहवेहविरुद्ध केलेली कुरकुर त्यांनी ऐकली आहे. आम्ही कोण आहोत की तुम्ही आमच्याविरुद्ध कुरकुर करावी?”

  5. मोशे म्हणाला, “संध्याकाळी जेव्हा याहवेह तुम्हाला मांस आणि सकाळी जी भाकर तुम्हाला पाहिजे ती खायला देतील, कारण त्यांनी त्यांच्याविरुद्ध केलेली तुमची कुरकुर ऐकली आहे. आम्ही कोण आहोत? तुम्ही आमच्याविरुद्ध नाही, तर याहवेहच्या विरुद्ध कुरकुर करीत आहात.”

  6. मग मोशे अहरोनाला म्हणाला, “संपूर्ण इस्राएली समुदायाला सांग, ‘याहवेहच्या समोर या, कारण त्यांनी तुमची कुरकुर ऐकली आहे.’ ”

  7. अहरोन सर्व इस्राएली लोकांशी बोलत असताना, त्यांनी रानाकडे पाहिले आणि त्यांना याहवेहचे गौरव ढगात प्रकट होत असलेले दिसले.

  8. याहवेह मोशेला म्हणाले,

  9. “मी इस्राएली लोकांची कुरकुर ऐकली आहे. त्यांना सांग, ‘सायंकाळी तुम्ही मांस खाल, व सकाळी तुम्ही भाकरीने तृप्त व्हाल. मग तुम्हाला समजेल की, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”

  10. जेव्हा तू अधिकार्‍यांबरोबर भोजन करतोस, तेव्हा तुझ्यासमोर काय आहे हे चांगले लक्षात घे,

  11. आणि जर तू खादाड असशील तर तुझ्या गळ्यावर सुरी लाव.

  12. त्याच्या स्वादिष्ट पदार्थांची हाव धरू नकोस, कारण ते भोजन फसविणारे आहे.