मुख्य मजकुरावर जा

The Death of Saints बद्दल बायबलमधील वचने

6 वचने · 32 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. बंधू आणि भगिनींनो, जे मरणामध्ये झोपी गेले आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही अजाण नसावे, अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशा नाही अशा इतर मनुष्यासारखा आपण खेद करू नये.

  2. कारण येशू मरण पावले आणि पुन्हा जिवंत झाले, असा आपला विश्वास आहे, त्याअर्थी येशूंमध्ये झोपी गेले आहेत त्यांना परमेश्वर माघारी आणतील यावर आपण विश्वास ठेवतो.

  3. स्वतः प्रभू येशूंच्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की आपण जे जिवंत आहोत आणि प्रभूच्या आगमनासमयी जिवंत असू, ते प्रभूला भेटण्यासाठी, जे आपल्यापूर्वी मरण पावले आहेत, त्यांच्या आधी, वर घेतले जाणार नाही.

  4. कारण प्रभू स्वतःच आज्ञा करणार्‍या मोठ्या ध्वनीने, प्रधान दूताच्या वाणीने आणि परमेश्वराच्या तुतारीच्या आवाजाने स्वर्गातून खाली उतरतील. मग ख्रिस्तामध्ये जे मरण पावले आहेत, ते प्रथम उठतील.

  5. त्यानंतर, जे आपण अजून जिवंत आहोत आणि मागे राहिलेले आहोत, असे सर्वजण मेघारूढ होऊन प्रभूला भेटण्यासाठी अंतराळात घेतले जाऊ आणि प्रभूजवळ सदासर्वकाळ राहू.

  6. या वचनांद्वारे परस्परांना प्रोत्साहन द्या.