Skip to content

Sower बद्दल बायबलमधील वचने

37 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. काही लोक त्या वाटेवर पडलेल्या बी प्रमाणे आहेत, जिथे वचन पेरले जाते. ते वचन लगेच ऐकतात, पण सैतान येतो आणि त्यांच्या हृदयात पेरलेले वचन हिरावून नेतो.

  2. काहीजण, खडकाळ जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात.

  3. पण वचनामुळे संकटे आली किंवा त्यांचा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. पण त्यांना मूळ नसल्यामुळे थोडा काळ टिकतात.

  4. काही असे आहेत, की ते काटेरी झुडपांमध्ये पेरणी केलेल्या बियांप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात;

  5. परंतु संसाराची चिंता, पैशांची लालसा व इतर गोष्टींची हाव यांची त्यांना भुरळ पडते आणि त्यामुळे परमेश्वराच्या वचनाची वाढ खुंटते व फळ येत नाही.

  6. याउलट काहीजण उत्तम जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात, स्वीकार करतात, पीक देतात—जे पेरले होते त्यापेक्षा तीसपट, साठपट आणि शंभरपट पीक देतात.”

  7. “एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला. तो बी पेरीत असताना, काही वाटेवर पडले; व तुडविले गेले व आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले.

  8. काही बी खडकाळ जमिनीवर पडले, ते वर आले, परंतु ओलाव्याच्या अभावी ती रोपे करपून गेली.

  9. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले, ते उगवले आणि त्याबरोबर वाढले, पण झुडपांनी त्याची वाढ खुंटविली.

  10. काही बी सुपीक जमिनीत पडले. ते उगवले आणि जेवढे पेरले होते, त्यापेक्षा शंभरपट पीक आले.” हे सांगून ते म्हणाले, “ज्याला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.”

  11. फसविले जाऊ नका; परमेश्वराचा उपहास करू शकत नाही. कारण मनुष्य जे पेरतो तेच कापतो!

  12. जो देहाकरीता पेरतो, त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी पेरतो त्याला पवित्र आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.