Self-Will बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
मग त्या नगरातील सर्व लोकांनी त्याला धोंडमार करून ठार मारावे. अशा रीतीने तुमच्यामधील दोष तुम्ही घालवून टाकावे म्हणजे सर्व इस्राएली लोक हे ऐकतील आणि घाबरतील.
परंतु शास्ते मरण पावले की लोक योग्य ते करण्याचे सोडून त्यांचे पूर्वज करीत त्यापेक्षा अधिक वाईट आचरण करू लागले. ते इतर दैवतांची उपासना करीत व त्यांच्या पापी चालीरीतींकडे हट्टाने पुन्हा वळत.
तुम्ही तुमच्या पूर्वजांसारखे ताठ मानेचे होऊ नका. याहवेहना शरण जा. त्यांनी सनातनकाळासाठी पवित्र केलेल्या त्यांच्या पवित्रस्थानात या. तुमचे परमेश्वर याहवेहची सेवा करा, म्हणजे त्यांचा भयंकर क्रोध तुमच्यापासून दूर होईल.
तुमची मनोवृत्ती घोड्यासारखी किंवा खेचरासारखी नसावी, ज्यांना काही समज नसते. त्यांना नियंत्रित करण्यासाठी अंकुश आणि लगाम लागतो, अन्यथा ते आपल्याजवळ येणार नाहीत.
आपले शिंग स्वर्गाविरुद्ध उंचावू नका; आपले मस्तक उंच करून बोलू नका.’ ”
(ती बेशिस्त आणि उर्मट आहे, तिचे पाय तिच्या घरात थांबत नाहीत;
अनेकदा कान उघाडणी केली तरीही जो ताठ मानेचाच राहतो, त्याचा अचानक नाश होईल—त्याला कोणताही इलाज नसेल.
तुम्ही किती हेकेखोर आहात हे मला माहीत होते; तुमच्या मानेचे स्नायू लोखंडाचे आणि तुमचे कपाळ कास्याचे आहेत.
“मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले: ‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे, आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे. मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन, कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात.
विशेषकरून अशा लोकांसाठी हे खरे आहे जे देहाच्या भ्रष्ट अभिलाषांच्या मागे लागतात आणि अधिकारास तुच्छ मानतात. धाडसी आणि उद्धट असून ते स्वर्गीय प्राण्यांची निंदा करण्यास घाबरत नाहीत;