Skip to content

Robbery बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “ ‘तुम्ही कोणाला फसवू नये किंवा तुमच्या शेजार्‍याला लुबाडू नये. “ ‘मजुरांची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नये.

  2. शेखेमाच्या नागरिकांनी त्याच्याविरुद्ध डोंगराच्या माथ्यावर वाटेवर दबा धरण्यास लोक ठेवले आणि त्या वाटेने जाणार्‍या येणार्‍या प्रत्येकाला ते लुबाडू लागले आणि हे कोणीतरी अबीमेलेखाचा सांगितले.

  3. “कारण मी याहवेह, मी न्याय प्रिय आहे; चोरी आणि अन्यायाचा मला तिटकारा आहे. माझ्या विश्वासूपणाने मी माझ्या लोकांना मोबदला देईन आणि त्यांच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन.

  4. “समजा त्याच मनुष्याचा एक हिंसक मुलगा आहे, जो रक्तपात किंवा त्यासारख्या इतर गोष्टी करतो

  5. तो व्याजाने उसने देतो आणि नफा घेतो. असा मनुष्य जगेल काय? तो जगणार नाही! कारण त्याने ही सर्व अमंगळ कृत्ये केली आहेत, तो मारला जाईल; आणि त्याचे रक्त त्याच्याच माथ्यावर राहील.

  6. गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांनी जर परत केल्या, चोरून घेतलेले परत केले, जीवन देणारे नियम पाळले आणि काही वाईट केले नाही; तो व्यक्ती खचित जगेल; ते मरणार नाहीत.

  7. उत्तर देत येशू म्हणाले: “एक मनुष्य खाली यरुशलेमाहून यरीहोला जात असताना, चोरांनी त्याच्यावर हल्ला केला, कपडे हिसकावून घेतले, मारहाण केली आणि त्याला अर्धमेल्या अवस्थेत टाकून ते निघून गेले.