Rape बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
परंतु एखाद्या पुरुषाने वाङ्निश्चय झालेल्या कुमारिकेला बाहेर शेतात गाठून तिच्यावर बलात्कार केला, तर असे करणार्या पुरुषाला ठार मारावे.
त्या कुमारिकेला काही करू नये; तिला मरणदंड मिळावा असे पाप तिने केले नाही. एखाद्याने आपल्या शेजार्यावर हल्ला करून त्याला ठार मारावे त्याप्रमाणे हे आहे,
कारण त्या पुरुषाने त्या एकट्या कुमारिकेला शेतात शोधून काढली आणि मदतीसाठी ती ओरडलीच असेल, परंतु ते ऐकण्यासाठी आणि तिची सुटका करण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नव्हते.
त्यांची बालके त्यांच्या डोळ्यासमोर आपटून, त्यांचे तुकडे केले जातील; त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांचा विनयभंग केला जाईल.
स्त्रियांना सीयोनात भ्रष्ट करण्यात आले आहे, व कुमारिकांना यहूदीयातील नगरात.
मी यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्यास सर्व राष्ट्रांना एकत्र करेन; नगर हस्तगत केले जाईल आणि घरे लुटली जातील, स्त्रियांवर बलात्कार करण्यात येईल. नगरीतील अर्धे लोक बंदिवासात जातील, परंतु उरलेले लोक नगरीतच राहतील.