Promotion बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
दावीद म्हणाला, “जो कोणी यबूसींवर हल्ला करण्यात पुढाकार घेईल तो सेनापती होईल.” मग जेरुइयाहचा पुत्र योआबने पहिल्याने आक्रमण करण्यास गेल्यामुळे तो दावीदाच्या सैन्याचा सेनापती झाला.
पूर्वेकडून, पश्चिमेकडून किंवा जंगलातून मनुष्याला स्वतःची उन्नती करता येत नाही.
मात्र परमेश्वरच न्याय करणारे आहेत: ते एकाला खाली पाडतात आणि दुसर्यास उंच करतात.
त्यांनी आपला सेवक दावीदाची निवड केली, त्यांनी त्याला मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले.
मेंढरांची राखण करीत त्यांच्यामागे फिरत असतानाच, त्यांनी आपली प्रजा याकोब अर्थात् आपले वतन इस्राएलाचा मेंढपाळ म्हणून त्याची निवड केली.
ते दीनांस धुळीतून वर काढतात, आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्यातून वर उचलून घेतात;
ते त्यांना राजपुत्रांबरोबर, आपल्या प्रजेच्या प्रधानांसह बसवितात.