मुख्य मजकुरावर जा

Priest बद्दल बायबलमधील वचने: Polluted by marrying idolatrous wives

6 वचने · 4 पैलू

Polluted by marrying idolatrous wives बद्दल वचने

  1. या सर्व गोष्टी आटोपल्यावर, यहूद्यांचे पुढारी माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितले, “इस्राएली लोक, याजक आणि लेवी यांनी स्वतःला कनानी, हिथी, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मोआबी, इजिप्तचे व अमोरी या मूर्तिपूजक लोकांच्या घृणास्पद चालीरीतीपासून अलिप्त ठेवले नाही.

  2. या लोकांनी सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या कन्यांचा स्वतःशी व आपल्या पुत्रांशी केलेल्या या विवाहांमुळे परमेश्वराचे पवित्र लोक मिश्रित झाले आहेत. काही राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांनी तर या विश्वासघातात पुढाकार घेतला आहे.”

  3. तेव्हा एज्रा उठून उभा राहिला आणि त्याने याजक, लेवी आणि सर्व इस्राएली लोकांच्या पुढार्‍यांनी शखन्याह म्हणतो त्याप्रमाणे करण्याची शपथ घ्यावी अशी मागणी केली आणि त्या सर्वांनी शपथ घेतली.

  4. ज्यांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले होते, त्या याजकांची यादी पुढीलप्रमाणे आहे: योसादाकाचा पुत्र येशूआ व त्याचे भाऊबंद: मासेयाह, एलिएजर, यारीब व गदल्याह.

  5. (त्यांनी आपल्या पत्नींना घटस्फोट देऊन सोडून देण्याची शपथ घेतली आणि मेंढ्याची अर्पणे करून आपली पापे कबूल केली.)

  6. “बाकी सर्व—याजक, लेवी, द्वारपाल, संगीतकार, मंदिराचे सेवक आणि बाकीचे इतर सर्व, ज्यांनी आपल्या पत्नी व सज्ञान पुत्र व कन्या यांच्यासह, परमेश्वराच्या नियमासाठी स्वतःला सभोवतीच्या लोकांपासून वेगळे केले होते—