मुख्य मजकुरावर जा

Pretorium बद्दल बायबलमधील वचने: Called also Common Hall, Judgment-hall, and Palace.

7 वचने · 1 पैलू

Called also Common Hall, Judgment-hall, and Palace. बद्दल वचने

  1. मग राज्यपालाच्या शिपायांनी येशूंना आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांना राजवाड्यात प्राइतोरियम येथे नेऊन सर्व सैनिकांच्या टोळीला तिथे एकत्र बोलाविले

  2. मग सैनिकांनी त्यांना राजवाड्यात म्हणजे प्राइतोरियम येथे नेले आणि सर्व सैनिकांच्या टोळीला एकत्र बोलाविले.

  3. मग यहूदी पुढार्‍यांनी येशूंना कयफाकडून रोमी राज्यपालाच्या राजवाड्यात नेले. तोपर्यंत पहाट झाली होती आणि आपण नियमशास्त्रानुसार अशुद्ध होऊ नये आणि आपल्याला वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः राजवाड्यात गेले नाहीत.

  4. मग पिलात राजवाड्यामध्ये परतला आणि त्याने येशूंना आपल्यापुढे बोलावून विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”

  5. आणि तो राजवाड्यामध्ये परत गेला. “तू कुठून आला आहेस?” त्याने येशूंना विचारले, परंतु येशूंनी त्याला उत्तर दिले नाही.

  6. राज्यपालांनी पौलाला सांगितले, “तुझ्यावर आरोप करणारे येथे आले की मी तुझे हे प्रकरण ऐकून घेईन.” नंतर राज्यपालांनी पौलाला हेरोदाच्या राजवाड्यातील पहार्‍यात ठेवण्याचा हुकूम दिला.

  7. याचा परिणाम असा झाला की, राजवाड्यामध्ये असलेले पहारेकरी आणि प्रत्येकास हे स्पष्टपणे माहीत झाले आहे की मी ख्रिस्तासाठी बंधनात आहे.