- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Pelatiah बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
हनन्याहचे पुत्र: पेलतियाह व यशायाह. यशायाहचा पुत्र रफायाह. रफायाहचा पुत्र नाव अर्णान. अर्णानला ओबद्याह हा झाला. ओबद्याहचा पुत्र शखन्याह.
त्यापैकी म्हणजे शिमओनाच्या गोत्रातील पाचशे पुरुषांनी इशीचे पुत्र पेलतियाह, निरय्याह, रफायाह व उज्जीएल यांनी त्यांचे नेतृत्व केले आणि ते सेईर डोंगरावर गेले.
तिथे जे पळून गेलेले अमालेकी उरले होते, त्यांचा संहार करून ते आजवर तिथे राहतात.
पेलतियाह, हानान, अनायाह,
नंतर आत्म्याने मला उचलून याहवेहच्या मंदिराच्या पूर्वेकडील द्वाराजवळ आणले. तिथे द्वाराच्या प्रवेशाकडे पंचवीस पुरुष होते आणि त्यांच्यामध्ये लोकांचे पुढारी अज्जूरचा पुत्र याजन्याह व बेनाइयाहचा पुत्र पेलातियाह यांना मी पाहिले.
याहवेहने मला म्हटले, “मानवपुत्रा, हे ते पुरुष आहेत जे दुष्टतेचा कट करून शहरात वाईट सल्ला देतात.
ते म्हणतात, ‘तुम्ही आपली घरांची हल्लीच पुनर्बांधणी केली नाही काय? हे शहर एक कढई व आपण त्यातील मांस असे आहोत.’
म्हणून त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग; मानवपुत्रा, भविष्यवाणी कर.”
मग याहवेहचा आत्मा माझ्यावर आला आणि त्यांनी मला असे बोलावयास सांगितले: “याहवेह असे म्हणतात: इस्राएलाच्या पुढार्यांनो तुम्ही असेच म्हणतात, परंतु तुमच्या मनात काय सुरू आहे ते मी जाणतो.
तुम्ही या नगरामध्ये पुष्कळांना मारून टाकले आणि त्यातील रस्ते प्रेतांनी भरून टाकले.
“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जी शरीरे तुम्ही तिथे टाकली आहेत ती मांस आहेत आणि हे शहर कढई असे आहे, परंतु मी तुम्हाला त्यातून बाहेर काढेन.
तुम्हाला तलवारीचे भय आहे आणि मी तुमच्याविरुद्ध तलवारच आणणार आहे, असे सार्वभौम याहवेह घोषित करतात.
मी तुम्हाला शहरातून बाहेर घालवेन आणि तुम्हाला विदेशी लोकांच्या हाती देईन आणि तुमच्यावर शिक्षा आणेन.
तुम्ही तलवारीने पडाल आणि इस्राएलच्या सीमांवर मी तुमच्यावर न्याय आणेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
हे शहर तुम्हाला कढई असे असणार नाही किंवा तुम्ही त्यात मांसही नसाल; इस्राएलच्या सीमेवर मी तुमचा न्याय करेन.
आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे, कारण तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही किंवा माझे विधी मानले नाही, परंतु तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या मापांप्रमाणे तुम्ही वागला.”
आता मी भविष्य सांगत असतानाच बेनाइयाहचा पुत्र पेलातियाह मरण पावला. तेव्हा मी उपडा पडून मोठ्या आवाजात रडलो, “अरेरे, सार्वभौम याहवेह! इस्राएलच्या उरलेल्यांचा आपण सर्वनाश करणार काय?”