Skip to content

Painting बद्दल बायबलमधील वचने

5 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. नंतर येहू येज्रीलास गेला. जेव्हा ईजबेलने हे ऐकले, तेव्हा तिने आपल्या पापण्या रंगविल्या व केशभूषा करून ती खिडकीतून बाहेर पाहत बसली.

  2. हे उद्ध्वस्त झालेल्या, तू काय करीत आहे? कशासाठी तू ही गडद वस्त्रे परिधान केली आहेस आणि अंगावर सोन्याचे दागिने चढविले आहेस? आपल्या डोळ्यांत काजळ घालून ते सजविले आहेस? या सर्व शृंगारांचा तुला काही एक उपयोग होणार नाही. तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात; तुला ठार करण्याची त्यांची इच्छा आहे.

  3. तो म्हणतो, ‘मी माझ्यासाठी एक भव्य राजवाडा बांधेन, ज्यामध्ये वरच्या मजल्यावर मोठमोठ्या खोल्या असतील.’ तो त्याला अनेक मोठ्या खिडक्या बांधतो, गंधसरूची तक्तपोशी करतो आणि सुंदर लाल रंगाने सजवितो.

  4. “परंतु तिने तिची वेश्यावृत्ती अजून पुढे नेली. भिंतीवर रेखाटलेल्या पुरुषांच्या प्रतिमा तिने पाहिल्या, जी लाल रंगाने रंगविलेली खास्द्यांची चित्रे होती,

  5. “जी माणसे दुरून आली होती त्यांना देखील त्यांनी बोलाविणे पाठवले आणि जेव्हा ते आले त्यांच्यासाठी तू स्नान केले, डोळ्यात काजळ घातले आणि आपले दागिने चढविले.