मुख्य मजकुरावर जा

Ophrah बद्दल बायबलमधील वचने: 2. A city in Manasseh, home of Gideon

5 वचने · 2 पैलू

2. A city in Manasseh, home of Gideon बद्दल वचने

  1. याहवेहचा दूत आला आणि ओफराह येथील एला वृक्षाखाली बसला. तो वृक्ष अबियेजरी योआशच्या मालकीचा होता, जिथे त्याचा पुत्र गिदोन मिद्यानी लोकांपासून वाचविण्यासाठी द्राक्षकुंडात गहू मळत होता.

  2. म्हणून गिदोनाने तिथे याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि तिला याहवेह शालोम, याहवेह शांती देतात असे नाव दिले. ही वेदी अद्यापही अबियेजरीकरांच्या मुलुखातील ओफराह या गावी आहे.

  3. गिदोनाने त्या सोन्याचे एक एफोद करून आपले नगर ओफराह येथे ठेवले. सर्व इस्राएली लोकांनी त्याची उपासना करून व्यभिचार केला आणि ते गिदोन आणि त्याच्या कुटुंबासाठी पाश असे झाले.

  4. योआशचा पुत्र गिदोन पूर्ण वयातीत होऊन मरण पावला व त्याला अबियेजर्‍यांच्या ओफराह येथे त्याचा पिता योआशच्या कबरेत पुरण्यात आले.

  5. तो ओफराह येथील आपल्या पित्याच्या घरी गेला व तिथे एका दगडावर त्याने आपल्या सत्तर भावांचा म्हणजे यरूब्बआलाच्या पुत्रांचा वध केला. परंतु यरूब्बआलाचा धाकटा पुत्र योथाम लपून निसटून गेला.