Jotham
Jotham चा उल्लेख असलेली वचने
तो ओफराह येथील आपल्या पित्याच्या घरी गेला व तिथे एका दगडावर त्याने आपल्या सत्तर भावांचा म्हणजे यरूब्बआलाच्या पुत्रांचा वध केला. परंतु यरूब्बआलाचा धाकटा पुत्र योथाम लपून निसटून गेला.
जेव्हा योथामाला हे सांगण्यात आले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर उभा राहिला व त्यांना उंच वाणीने ओरडून म्हणाला, “शेखेमातील नागरिकांनो माझे ऐका, म्हणजे परमेश्वर तुमचे ऐकतील.
मग योथाम निसटून गेला व आपला भाऊ अबीमेलेखाच्या भीतीमुळे बैर येथे जाऊन राहिला.
शेखेमातील लोकांच्या सर्व दुष्टाईबद्दल परमेश्वराने त्यांना शिक्षा दिली. यरूब्बआलाचा पुत्र योथामचा शापही त्यांच्यावर आला.