Skip to content

Offence बद्दल बायबलमधील वचने: Sons of Eli

6 वचने · 31 पैलू

Sons of Eli बद्दल वचने

  1. एलीचे पुत्र अतिशय नीच होते; ते याहवेहचा आदर करीत नसत.

  2. याजकांची अशी रीत होती की, ज्यावेळेस लोकांमधील कोणी यज्ञार्पण केले व जेव्हा ते मांस शिजविले जात असे, तेव्हा याजकांचा सेवक तीन टोके असलेला काटा घेऊन येत असे

  3. आणि परातीत किंवा पातेल्यात किंवा कढईत किंवा गंगाळात तो काटा टाकून जितके मांस त्या काट्याने वरती येईल याजक ते आपल्या स्वतःसाठी घेत असे, शिलोह येथे आलेल्या सर्व इस्राएल लोकांशी ते असाच व्यवहार करीत असत.

  4. परंतु चरबी जळण्याच्या आधी, याजकाचा सेवक येऊन यज्ञ करीत असलेल्या व्यक्तीला म्हणत असे, “भाजून घेण्यासाठी याजकाला थोडे मांस दे; तो तुझ्याकडून शिजविलेले मांस स्वीकारणार नाही, तर कच्चेच मांस घेईल.”

  5. जर तो व्यक्ती त्याला म्हणाला, “प्रथम चरबी जळू दे, त्यानंतर तुला हवे ते तू घे,” तो सेवक उत्तर देत असे, “नाही, ते आताच दे; जर तू दिले नाही, तर मी ते सक्तीने घेईन.”

  6. या तरुणांचे हे पाप याहवेहच्या दृष्टीने फार मोठे होते, कारण लोकांना याहवेहच्या अर्पणाचा तिरस्कार येऊ लागला होता.