Skip to content

New Moon बद्दल बायबलमधील वचने: Feast of

8 वचने · 2 पैलू

Feast of बद्दल वचने

  1. तुमच्या आनंदाच्या प्रसंगी; तुमचे नेमलेले सण व महिन्याच्या आरंभीची मेजवानी, जेव्हा तुम्ही आपली होमार्पणे व शांत्यर्पणे आणता, त्यावेळी सुद्धा तुम्ही कर्णे वाजवा आणि ते याहवेहसमोर तुमच्यासाठी स्मरणार्थ असेल. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”

  2. “प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी दोन तरुण गोर्‍हे, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे होमार्पण म्हणून याहवेहसाठी अर्पण करावे, हे सर्व निर्दोष असावेत.

  3. प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ; आणि एका मेंढ्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशांश बारीक पीठ;

  4. आणि प्रत्येक कोकर्‍याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशांश बारीक पीठ अर्पण करावे. हे होमार्पण सुवासिक अर्पण, अन्नार्पण म्हणून याहवेहसाठी सादर करावे.

  5. प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर अर्धा हीन पेयार्पण; आणि प्रत्येक मेंढ्याबरोबर एकतृतीयांश हीन, व प्रत्येक कोकर्‍याबरोबर एक पाव हीन द्राक्षारस आणावा. वर्षभरातील प्रत्येक पोर्णिमेच्या दिवशी करावयाचे हे मासिक होमार्पण आहे.

  6. नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय एक बोकड पापार्पण म्हणून याहवेहला सादर करावा.

  7. शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या दिवशी आणि इतर सणांमध्ये विशेष होमार्पणाच्या कामात ते नित्यनेमाने याहवेहची सेवा त्यांना नेमून दिल्यानुसार करीत होते.

  8. राजाने सकाळ आणि संध्याकाळच्या होमार्पणासाठी आणि शब्बाथ, नवचंद्र आणि याहवेहच्या नियमात लिहिल्याप्रमाणे ठरवून दिलेल्या सणांसाठी स्वतःच्या मालमत्तेतून दान दिले.