Myrrh बद्दल बायबलमधील वचने: Used as a perfume
Used as a perfume बद्दल वचने
अहश्वेरोश राजाच्या शयनमंदिरात नेण्यापुर्वी प्रत्येकीवर बारा महिने सौंदर्यप्रसाधनांचे उपचार करण्यात येत, सहा महिने गंधरसाच्या तेलाचा उपचार व सहा महिने खास सुवासिक द्रव्ये व प्रसाधनांचा उपचार केला जाई.
तुझे झगे गंधरस, जटामांसी आणि दालचिनी यांनी सुगंधित केलेले आहेत; तुझ्या हस्तिदंती राजवाड्यामध्ये, तंतुवाद्याचे संगीत तुला आनंदित करतात.
ऊद, जटामांसी व दालचिनी यांनी मी माझी शय्या सुवासिक केली आहे.
हा धुराच्या स्तंभासारखे व्यापाऱ्यांच्या सर्व सुगंधित पदार्थांनी, ऊद आणि गंधरस यांनी सुगंधित, असा रानातून हा कोण येत आहे?
त्याचे गाल सुगंधी वनस्पतीच्या वाफ्यासारखे अत्तर दरवळणारे आहेत. त्याचे ओठ गंधरस गाळणार्या कमळपुष्पासारखे आहे.