Melchizedek बद्दल बायबलमधील वचने: King of Salem
King of Salem बद्दल वचने
शालेमचा राजा मलकीसदेक जो परात्पर परमेश्वराचा याजक होता, तो अब्रामाला भाकर व द्राक्षारस घेऊन आला.
आणि त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ते परात्पर परमेश्वराद्वारे अब्राम आशीर्वादित असो.
ज्या सर्वसमर्थ परमेश्वराने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले ते परमेश्वर धन्यवादित असो.” मग अब्रामाने मलकीसदेकाला सर्वांचा दहावा भाग दिला.
याहवेहने जी शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस.”