Makkedah बद्दल बायबलमधील वचने: Five kings of the Amorites hide in a cave of, and are slain by Joshua
Five kings of the Amorites hide in a cave of, and are slain by Joshua बद्दल वचने
तेव्हा ते पाच राजे पळून गेले व मक्केदा येथे गुहेत लपून बसले.
ते पाच राजे मक्केदा येथील एका गुहेत लपलेले आहेत हे जेव्हा यहोशुआला कळविण्यात आले,
तेव्हा यहोशुआ म्हणाला, “मोठे धोंडे गुहेच्या तोंडावर लोटा आणि त्याचे राखण करावयाला काही माणसांना तिथे बसवा.
पण थांबू नका; शत्रूचा पाठलाग चालू ठेवा! त्यांच्यावर मागून हल्ला करा आणि त्यांना त्यांच्या शहरांकडे जाऊ देऊ नका, कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी त्यांना तुमच्या हातात दिले आहे.”
तेव्हा यहोशुआ आणि इस्राएली सैन्याने त्यांचा पूर्ण पराभव केला, परंतु त्यातून काही लोक वाचले व त्यांच्या तटबंदीच्या शहरात गेले.
मग संपूर्ण इस्राएली सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशुआकडे सुरक्षित परतले. त्यानंतर इस्राएलविरुद्ध कोणीही एकही शब्द उच्चारला नाही.
यहोशुआने म्हटले, “गुहेचे तोंड उघडून त्या पाच राजांना माझ्याकडे बाहेर आणा.”
मग त्या गुहेतून पाच राजे—यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश आणि एग्लोन या नगरांच्या राजांना बाहेर काढण्यात आले.
जेव्हा त्या पाच राजांना बाहेर काढून यहोशुआ पुढे हजर करण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली पुरुषांना बोलाविले. मग त्याच्यासोबत आलेल्या सेनेच्या अधिकार्यांना तो म्हणाला, “इकडे या व आपले पाय या राजांच्या मानेवर ठेवा.” तेव्हा ते पुढे आले आणि त्यांनी आपले पाय या राजांच्या मानेवर ठेवले.
तेव्हा यहोशुआ त्यांना म्हणाला, “भिऊ नका; निराश होऊ नका. खंबीर आणि धैर्यवान व्हा, कारण याहवेह तुमच्या सर्व शत्रूंच्या बाबतीत हेच करणार आहेत.”
नंतर यहोशुआने त्या राजांचा वध केला आणि त्यांची मृत शरीरे पाच झाडांवर संध्याकाळपर्यंत तशीच टांगून ठेवली.
सूर्य मावळू लागला, तेव्हा यहोशुआने आज्ञा दिली की त्या राजांचे मृतदेह झाडांवरून खाली काढा आणि ते ज्या गुहेमध्ये लपून राहिले होते त्या गुहेत ती फेकून द्या. हे केल्यावर गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठ्या खडकांची रास रचून ठेवली. आजपर्यंत ती रास तिथेच आहे.