Skip to content

Lamech बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. हनोखपासून ईराद झाला आणि ईराद हा महूयाएलचा पिता, महूयाएल हा मथुशाएलचा पिता, मथुशाएल हा लामेखाचा पिता होता.

  2. लामेखाने आदाह व सिल्ला या दोन स्त्रियांशी लग्न केले.

  3. आदाह हिला याबाल नावाचा पुत्र झाला. तो गुरे पाळणार्‍या व तंबू ठोकून राहणार्‍या लोकांचा मूळ पुरुष झाला.

  4. त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो पहिला संगीतकार असून वीणा व बासरी ही वाद्ये वाजविणार्‍यांचा मूळ पुरुष झाला.

  5. लामेखाची दुसरी स्त्री सिल्ला हिला तुबल-काईन झाला. तो कास्य व लोखंड यांची हत्यारे बनविणार्‍यांचा मूळ पुरुष झाला. तुबल—काईनास नामाह नावाची बहीण होती.

  6. एके दिवशी लामेख आपल्या पत्नींना म्हणाला, आदाह व सिल्ला माझे ऐका, “लामेखाच्या पत्नींनो, माझे बोलणे ऐका. एका तरुणाने माझ्यावर हल्ला करून मला जखमी केले. पण त्या तरुणाला मी ठार मारले आहे.

  7. जर काईनाबद्दल सातपट तर लामेखाबद्दल सत्याहत्तरपट सूड घेतला जाईल.”