Hunger बद्दल बायबलमधील वचने: Of Jesus
Of Jesus बद्दल वचने
चाळीस दिवस व चाळीस रात्र त्यांनी उपवास केला, तेव्हा त्यांना भूक लागली.
मग परीक्षक येशूंकडे आला व म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या दगडांना भाकरीत रूपांतर होण्यास सांग.”
तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “ ‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेल’ असे लिहिले आहे.”
तिथे चाळीस दिवस सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. या दिवसांमध्ये त्यांनी काही खाल्ले नाही आणि ते संपल्यानंतर त्यांना भूक लागली.
सैतान येशूंना म्हणाला, “जर तू परमेश्वराचा पुत्र असशील, तर या दगडाला भाकर होण्यास सांग.”
पण येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे: ‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही.’ ”