Skip to content

Heifer बद्दल बायबलमधील वचने: An atonement for murder

9 वचने · 7 पैलू

An atonement for murder बद्दल वचने

  1. याहवेह तुमच्या परमेश्वराने वतन म्हणून दिलेल्या देशात तुम्ही आल्यावर एखाद्या शेतामध्ये वध झालेला मनुष्यदेह तुम्हाला आढळला व त्याला कोणी मारले हे समजले नाही,

  2. तर वडीलजनांनी आणि न्यायाधीशांनी तिथे जाऊन त्या मृतदेहापासून आजूबाजूच्या प्रत्येक नगरापर्यंत अंतर मोजावे.

  3. नंतर मृतदेहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील वडीलजनांनी, कधीही कामास न लावलेली आणि पूर्वी कधीही जू न ठेवलेली अशी एक कालवड घ्यावी

  4. आणि तिला वडिलांनी ज्या भूमीची कधी नांगरणी अथवा पेरणी केलेली नाही, अशा सतत पाणी वाहत असलेल्या खोर्‍यात नेऊन तिथे कालवडीची मान मोडावी.

  5. यानंतर लेवी वंशातील याजक जवळ येतील, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना आपल्यासमोर सेवा करण्यासाठी याहवेहच्या नावाने आशीर्वाद देण्यासाठी व वाद आणि हल्ला यांचे निर्णय घेण्यासाठी निवडलेले आहे.

  6. मग मृत माणसाच्या देहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील सगळे वडीलजन आपले हात खोर्‍यात मान मोडून टाकलेल्या त्या कालवडीवर धुतील,

  7. आणि त्यांनी हे घोषित करावे, “आमच्या हातांनी हा रक्तपात केलेला नाही किंवा आमच्या डोळ्यांनी तो पाहिलेला नाही.

  8. हे याहवेह, ज्या तुमच्या इस्राएली लोकांना तुम्ही सोडविले आहे, त्या लोकांना तुम्ही क्षमा करा व निरपराधी माणसाच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवू नका.” मग या रक्तपाताचे प्रायश्चित्त होईल,

  9. आणि तुम्ही तुमच्यावरील निरपराधी माणसाच्या रक्तपाताचा दोष घालवून टाकाल, कारण याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले आहे.