Harlot बद्दल बायबलमधील वचने: Shamelessness of
Shamelessness of बद्दल वचने
(ती बेशिस्त आणि उर्मट आहे, तिचे पाय तिच्या घरात थांबत नाहीत;
आता तर ती रस्त्यावर आहे, आता ती चौकांमध्ये आहे प्रत्येक कोपर्यावर ती लपून बसते.)
तिने त्याला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले, आणि निर्लज्ज चेहऱ्याने ती म्हणाली:
आज मी माझी वचने पूर्ण केली आहेत, आणि माझ्या घरी शांत्यर्पण आहे.
म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी बाहेर आले; मी तुला शोधले आणि तू मला सापडलास!
मी माझा पलंग इजिप्त येथील सुताच्या रंगीबेरंगी चादरींनी सजविला आहे.
ऊद, जटामांसी व दालचिनी यांनी मी माझी शय्या सुवासिक केली आहे.
चल, पहाटेपर्यंत आपण प्रीतीत यथेच्छ रमून जाऊ; आपण एकमेकांना प्रीतीचा आनंद देऊ!
कारण माझे पती घरी नाहीत; ते दूर प्रवासाला गेले आहेत;
त्याने त्याची पैशाची थैली भरून घेतली आहे, आणि पौर्णिमेपर्यंत ते घरी परत येणार नाहीत.
तिच्या मोहक शब्दांनी वश करून तिने त्याला चुकीच्या मार्गाने नेले; गोड बोलून तिने त्याला मोहात पाडले.
जसा बैल कापणार्याकडे जातो, तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, हरिण जसे दोर्यांच्या फासात पाय टाकते
तोपर्यंत बाण त्याच्या पोटात घुसतो, ज्याप्रमाणे पक्षी वेगाने पाशात अडकतो, त्याला माहीत नसते की ते त्याच्यासाठी प्राणघातक आहे.
तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, मी काय बोलतो त्याकडे लक्ष द्या.
तुमचे मन तिच्या मार्गाकडे जाऊ देऊ नका किंवा बहकून जाऊन तिच्या वाटेने जाऊ नका.
कारण तिने अनेकांना घायाळ करून पाडले आहे; होय, अनेक बलवान पुरुषांना तिने ठार केले आहे.
तिचे घर हा नरकाकडे जाणारा महामार्ग, आणि खाली मृत्यूच्या खोल्यांकडे नेणारा मार्ग आहे.
मूर्खपणा एक स्वैर स्त्री आहे; ती साधीभोळी आहे आणि तिला काहीच समज नाही.
ती तिच्या घराच्या दारात बसून राहते, तसेच नगराच्या सर्वात उंच ठिकाणावर ती बसते.
तिच्याजवळून जाणाऱ्या, जे सरळ त्यांच्या मार्गाने जातात, त्यांना ती बोलाविते,
“जे साधे भोळे आहेत त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते,
“चोरलेले पाणी गोड लागते; गुप्तपणे खाल्लेले अन्न चविष्ट लागते!”
परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथे मेलेले लोक आहेत, आणि तिचे पाहुणे आता मृतांच्या खोल जगात आहेत.