Gardens बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली व वाहू लागली आणि ती विभागून तिच्या चार नद्या झाल्या
पहिल्या नदीचे नाव पीशोन असून ती सोने असलेल्या हवीला प्रदेशाला वेढा घालून वाहते.
त्या प्रदेशातील सोने उत्तम प्रतीचे असून तिथे मोती व गोमेद रत्नेही सापडतात.
दुसर्या नदीचे नाव गीहोन असून ती कूशच्या सर्व प्रदेशाभोवती वाहत जाते.
तिसर्या नदीचे नाव हिद्दकेल असून ती अश्शूरच्या पूर्वेस वाहत जाते; आणि चौथ्या नदीचे नाव फरात असे आहे.